Breaking News | जम्मू-काश्मीरच्या डोडोमध्ये दहशतवादी हल्ला; लष्कराच्या तळावरच गोळीबार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
24
Breaking News | जम्मू-काश्मीरच्या डोडोमध्ये दहशतवादी हल्ला; लष्कराच्या तळावरच गोळीबार | Navarashtra (नवराष्ट्र)


जम्मू-काश्मीरच्या डोडोमध्ये दहशतवादी हल्ला; लष्कराच्या तळावरच गोळीबार

दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या ऑपरेटिंग बेसवर (टीओबी) गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

डोडा : जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorist Attack) केला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावरच गोळीबार केला. याला भारतीय लष्करातील जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून, यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं. दरम्यान कठुआ आणि रियासी या ठिकाणी नुकताच दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हल्ला झाला आहे.

दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या ऑपरेटिंग बेसवर (टीओबी) गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दहशतवाद्याच्या गोळीबारात एक स्थानिक व्यक्ती जखमी झाला. याबाबतची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा दिली.






Source link