Boyz 4: ‘खानदानचं नाव खासगीत मोठं करणार’, बॉईज ४चा टीझर प्रदर्शित

0
17
Boyz 4: ‘खानदानचं नाव खासगीत मोठं करणार’, बॉईज ४चा टीझर प्रदर्शित


‘बॉईज ४’ चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, “या त्रिकुटाच्या मैत्रीची सुरूवात, चांगल्या, वाईट प्रसंगी एकमेकांना दिलेली साथ, थट्टामस्करी यापूर्वीच्या तीन भागांमध्ये सर्वांनी पाहिलेली आहे. मात्र आता या मैत्रीत ट्विस्ट येणार आहे. ’बॉईज’ च्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. चित्रपटातील कलाकार जरी तेच असले तरी प्रत्येक वेळी आम्ही प्रेक्षकांसाठी कथेत नवनवीन वळणे आणली. यावेळीही असेच सरप्राईज आहे. त्यात आता आणखी जबरदस्त कलाकार सामील झाले आहेत. त्यामुळे आता ही धमाल चौपट झाली आहे.”



Source link