“बोराटवाडीच्या मुलींचा हॉलिबॉलमध्ये डंका – तिन्ही गटांत विजेतेपदाची कमान!”

0
29
“बोराटवाडीच्या मुलींचा हॉलिबॉलमध्ये डंका – तिन्ही गटांत विजेतेपदाची कमान!”

साहस Times :-    जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय हॉलिबॉल मुलींच्या स्पर्धा माध्यमिक विद्यालय, म्हसोबावाडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडीच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत तिन्ही वयोगटात विजेतेपद पटकावले.

१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगटातील संघानेही प्रथम क्रमांक पटकावला, तर १९ वर्षे वयोगटातील संघ उपविजेता ठरला. विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक श्री. सदाशिव सावंत, श्री. चंद्रशेखर काळे व संघ व्यवस्थापक श्री. भीमराव खाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष मा. सहकार मंत्री मा. श्री. हर्षवर्धन पाटील, संचालक उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोजराव पाटील, सचिव किरणराव पाटील, प्राचार्य भीमराव आवारे, ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले.