
मनोरंजन विश्वात येऊन अभिनेता बनायचे असे बोमन इराणी यांनी कधीच ठरवले नव्हते. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी बोमन इराणी यांना फोटोग्राफर बनायचे होते. बोमन इराणी फोटोग्राफीची इतकी आवड होती की, आजूबाजूला घडणार प्रत्येक क्षण ते कॅमेऱ्यात टिपत असत. त्यांच्या फोटोग्राफीच्या आवडीमुळे त्यांना पहिल्यांदा पुण्यात बाइई रेस फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांना फोटोग्राफर म्हणून मुंबईत झालेल्या ‘बॉक्सिंग वर्ल्ड कप’चे कव्हर करण्याची संधी मिळाली.








