Bollywood Nostalgia: ‘तुझे याद ना मेरी आयी…’ गाणं होतं भलत्याच चित्रपटाचं! मग ‘कुछ कुछ होता है’मध्ये कसं आलं?

0
17
Bollywood Nostalgia: ‘तुझे याद ना मेरी आयी…’ गाणं होतं भलत्याच चित्रपटाचं! मग ‘कुछ कुछ होता है’मध्ये कसं आलं?


करण जोहरने या चित्रपटाची कथा सांगितली, तेव्हा संगीतकारांना माहित होते की, या चित्रपटाचे संगीत बनवणे सोपे नाही. त्यामागे देखील एक मोठं होतं. याविषयी बोलताना ललित म्हणाले, ‘या चित्रपटात कॉलेज, पहिले प्रेम, ब्रेकअप, लग्न, मुले अशी वेगवेगळ्या प्रसंगांवरची गाणी बनवावी लागणार होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाचे संगीत तयार केले जात होते, तेव्हा करण जोहर त्यात सहाय्य करत होता. तेव्हा मला माहित नव्हते की, तो त्या चित्रपटाची कथा देखील लिहित आहे. त्यादरम्यान त्याच्याशी चांगली मैत्री झाली. जेव्हा चित्रपटाची कथा लिहून पूर्ण झाली, तेव्हा आदित्य चोप्रा यांनी मला आणि जतीनला विचारले की, आपण या चित्रपटासाठी वेळ देऊ शकाल का? त्यावर मी हो म्हणालो. करणने या चित्रपटाची कथा इतक्या सुंदर पद्धतीने सांगितली होती की, मला असे वाटले की मी संपूर्ण चित्रपट माझ्यासमोर आताच पाहत आहे. त्यानंतर दमदार म्युझिक बनवण्यातही आम्ही कोणतीही कसर सोडली नाही.’



Source link