Blast in Kerala | केरळ हादरलं ! ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनासभेत एकापाठोपाठ 5 भीषण स्फोट; एका महिलेचा मृत्यू तर 20 जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Blast in Kerala | केरळ हादरलं ! ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनासभेत एकापाठोपाठ 5 भीषण स्फोट; एका महिलेचा मृत्यू तर 20 जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)


केरळ हादरलं ! ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनासभेत एकापाठोपाठ 5 भीषण स्फोट; एका महिलेचा मृत्यू तर 20 जण जखमी

केरळमधील एर्नाकुलम (Ernakulam Blast) येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी एकापाठोपाठ एक असे 5 भीषण बॉम्बस्फोट झाले. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम (Ernakulam Blast) येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी एकापाठोपाठ एक असे 5 भीषण बॉम्बस्फोट झाले. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलामासेरीमध्ये असलेल्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 9.30 च्या सुमारस ही घटना घडली.

कलामसेरी येथील एका कन्व्हेंशन सेंटरमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना सभा सुरू होती. ही सभा सुरू असतानाच अचानक स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.






Source link