
इराणच्या दक्षिणेकडील केरमान शहरात दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 103 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 200 जण जखमी झाले आहेत. इराणचा दिवंगत टॉप जनरल कमांडर कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ हे बॉम्बस्फोट झाले.
तेहरिन : इराणच्या दक्षिणेकडील केरमान शहरात दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 103 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 200 जण जखमी झाले आहेत. इराणचा दिवंगत टॉप जनरल कमांडर कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ हे बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांची अद्याप कोणीही जबाबदारी घेतली नाही. मात्र, अज्ञात दहशतवाद्यांना या बॉम्बस्फोटासाठी इराणने जबाबदार धरले आहे.
इराणमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये लोक रस्त्यावर इकडे-तिकडे धावताना दिसतात. इराणच्या ‘नॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन’चे प्रवक्ते बाबक येक्ता परस्त यांनी सांगितले की, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे, असे वृत्त अल जझीराने दिले आहे. स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. आवश्यक असल्यास, आपत्कालीन सेवा रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे करमान ते तेहरानपर्यंत नेण्यासाठी सज्ज आहेत, असे ते म्हणाले.









