
चिराग पासवान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्टर शेअर केली आहे. चिराग पासवान जनआशीर्वाद महासभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पाटणा : लोकजनशक्ती पक्ष रामविलास राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. एनडीएमध्ये अद्याप जागावाटप नाही पण त्याआधी चिराग पासवान यांनी बिहारमध्ये लोकसभेच्या जागेसाठी तयारी सुरू केली आहे.
10 मार्च रोजी चिराग पासवान यांची मोठी रॅली होणार आहे. यात काहीतरी मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जमुईचे खासदार आणि एलजेपी (राम विलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान हे सध्या बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीत दिसत नाहीत. यावरून अनेक प्रकारचे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.










