
Bigg Boss OTT 3 Latest Update: ‘बिग बॉस ओटीटी ३‘ सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असून, अवघ्या ३ दिवसांतच घरातील दोन सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती टांगती तलवार लटकू लागली आहे. नुकताच या शोमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये सना सुलतान, साई केतन, रणवीर शौरी, दीपक चौरसिया, शिवानी कुमारी आणि नीरज गोयत यांच्या नावाचा समावेश होता. या टास्कदरम्यान घरातील केवळ काही सदस्यांची नावे होती. मात्र, बिग बॉसने फक्त शिवानी आणि नीरज यांनाच एलिमिनेशनसाठी नॉमिनेट केले आहे.







