
जिया शंकर स्वतःचे कॅप्टनपद वाचवण्यासाठी खुर्चीवर बसली. मात्र, यावेळी मनीषा राणी, बेबिका आणि अभिषेक मल्हान यांनी तिला खुर्चीवरून उठवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनी कधी तिच्या अंगावर मिरची पावडर टाकाली, तर कधी शाम्पू ओतला. या गोष्टीच नाही तर, त्यांनी तिला खुर्चीवरून उठवण्यासाठी तिच्या अंगावर हँडवॉश, तेल, काळी मिरी, पाने अशा बऱ्याच गोष्टी टाकल्या. अशा स्थितीत जिया शंकर मात्र खचली नाही. सायरस आणि पूजा भट्ट यांनी तिच्यावर फोम क्रीम लावले. मात्र, त्यानंतर ते शांत बसले. तर, दुसरीकडे अविनाश जियाला मदत करण्यासाठी तिच्यावर पाणी ओतताना दिसला. यादरम्यान अविनाश आणि अभिषेकमध्ये भांडण देखील झाले.








