
आता ‘वीकेंड का वार’ भागामध्ये सलमान खान दोघांना फटकारताना दिसणार आहे. ‘वीकेंड का वार’च्या एपिसोडचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये सलमान खान चांगलाच संतापलेला दिसत आहे. यावेळी सलमान खान म्हणाला की, ‘तुम्हा सर्वांना असे वाटते की, हे कृत्य या आठवड्याचे मुख्य आकर्षण होते. हहा टास्क संगोपन, कुटुंब, नैतिकता, तुमच्या सभ्यतेचे दर्शन घडवण्यासाठी होता. तुम्ही लोकांनी माझी माफी मागण्याची गरज नाही. तुम्ही काहीही केले तरी आता मला काही फरक पडत नाही. मी इथून निघून जात आहे. मी हा शो सोडत आहे.’







