
‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरात आलिया सिद्दीकी सतत तिच्या नवाजुद्दीनसोबत तुटलेल्या लग्नाबद्दल बोलत असायची. यावरून सलमान खानने देखील तिला फटकारले होते. मात्र, आलियाच्या या सततच्या बडबडीने केवळ सलमानच नाही, तर पूजा भट्टही वैतागली होती. पूजा भट्टने देखील आलियाला या वरून फटकारले होते. यावरून दोघींमध्ये खडाजंगी झाली होती. मात्र, आता आलियाला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.







