
काय आहे प्रोमो?
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठी सिझन पाच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाची झलक दाखवली आहे. एक गायक पाठमोरा उभा असल्याचे दिसत आहे. आता हा गायक नेमका कोण आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ शेअर करत कलर्स वाहिनीने ‘येतोय सुरांचा बादशाह ग्रँड प्रिमिअरचा ग्रँड परफॉर्मन्स. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चा ग्रँड प्रिमिअर या रविवारी २८ जुलै, रात्री ९ वाजता’ असे कॅप्शन दिले आहे.






