
Bigg Boss Marathi 5 Top 3 Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला २८ जुलैपासून सुरुवात झाली होती. आज या शोची सांगता होणार आहे. यंदा हा शो ७० दिवसांचा होता, ज्यामध्ये १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ग्रँड फिनालेत सहा स्पर्धकांनी प्रवेश केला होता. तर, प्रेक्षकांना देखील कोण ही ट्रॉफी जिंकणार याची उत्सुकता होती.या दरम्यान चार स्पर्धक या शर्यतीतून बाहेर पडले. तर, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघे घराची लाईट बंद करून बाहेर आले. मात्र, त्या आधी निक्की तांबोळी घरातून बाहेर पडली. या एलिमिनेशनसाठी खास आलिया भट्ट या मंचावर आली होती.