Bigg Boss 18: प्रतीक्षा संपणार! आज होणार ‘बिग बॉस १८’चा ग्रँड प्रीमियर; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

0
1
Bigg Boss 18: प्रतीक्षा संपणार! आज होणार ‘बिग बॉस १८’चा  ग्रँड प्रीमियर; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…


Bigg Boss 18 Grand Premier Timings : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानचा शो ‘बिग बॉस १८’ सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून बिग बॉस १८ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज ती प्रतीक्षा संपणार आहे. बिग बॉसमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असतं. यावेळी नवीन काय असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. या नव्या सीझनच्या प्रतिक्षेदरम्यान चॅनेलकडून सातत्याने नवनवीन प्रोमो रिलीज केले जात आहेत. हे प्रोमो पाहून चाहते अधिकच उत्साहित होत आहेत.  



Source link