
‘मला वाटते की, मी बिग बॉसच्या घरात एकटी आली आहे. तू माझ्यासोबत नाहीस, तू मला साथ देत नाहीस’, असे अंकिता विकीला सांगताना दिसणार आहे. अंकिताला असं रडताना पाहून विकी तिला मिठी मारून धीर देण्याचा प्रयत्न करणार आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यापूर्वी सलमान खानशी बोलताना अंकिताने सांगितले होते की, विकी लोकांशी लगेच मैत्री करतो. विकीच्या या सवयीमुळे बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये हा वाद पाहायला मिळणार आहे.








