
सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल झाले आहे. या ट्वीटमध्ये यूके राइडर अनुराग डोभालचा झोपतानाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो शेअर करत, टीव्ही कलाकारांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. बिग बॉस अनुराग डोवाल याला झोपेच्या गोळ्या देत आहेत, जेणेकरून तो दिवसभर झोपू शकेल…’ असे म्हटले आहे. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान याने ‘वीकेंड का वार’चा स्क्रिन शॉट सर्वांना दाखवला. ट्वीट पाहिल्यानंतर अनुराग याच्यासोबत अन्य स्पर्धकांना शोमध्ये आमच्यासोबत असे काहीही होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.






