
Bigg Boss 17 Latest Update: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १७’मध्ये आता फॅमिली वीक सुरू झाला आहे. ‘फॅमिली वीक’च्या पहिल्याच दिवशी विकी जैनची आई, अंकिता लोखंडेची आई आणि अरुण महाशेट्टीची पत्नी यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती. नुकताच या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोनुसार, घरातील सदस्य आल्याचे पाहून सगळे स्पर्धक भावूक झालेले दिसले. त्याचवेळी स्पर्धक मुनव्वर फारुकीच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले. त्याला देखील त्याच्या आईची आठवण येऊ लागली होती. तर, विकी जैनची आई अर्थात सासू घरात आल्यानंतर काही वेळातच अंकिताने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या दोघींमध्ये यावेळी चांगलेच वाद झालेले पाहायला मिळाले.








