
‘बिग बॉस १७’मध्ये कोणते स्पर्धक येणार याची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांबाबत चर्चा सुरू आहे. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिक यांच्यासह अनेक स्टार्स ‘बिग बॉस’च्या घरात कैद होऊ शकतात, असे बोलले जात आहे.







