Bigg Boss: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याला झाली अटक; नेमकं प्रकरण काय? वाचा…

0
23
Bigg Boss: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याला झाली अटक; नेमकं प्रकरण काय? वाचा…


Bigg Boss Fame Actor Arrest: काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस तेलुगु’ सीझन ७चा महाअंतिम सोहळा पार पडला. यात विजेता ठरलेल्या अभिनेता पल्लवी प्रशांत याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘बिग बॉस’ ग्रँड फिनालेनंतर विजेता पल्लवी प्रशांत, या शोचा उपविजेता अमरदीप चौधरी आणि त्यांचे चाहते यांच्यात अन्नपूर्णा स्टुडिओजवळ झालेल्या हाणामारीत अभिनेता पल्लवी प्रशांत याच्या विरोधात एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशांतसोबतच त्याचा धाकटा भाऊ मनोहर, त्याचे मित्र आणि चाहते यांच्याविरुद्धही अनेक कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून या प्रकरणातील अन्य आरोपींची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तेलंगणा पोलिसांनी सिद्धीपेट जिल्ह्यातील गजवेल येथून पल्लवी प्रशांतला अटक केली आहे.



Source link