
बेंगळुरू मेट्रोच्या डब्यात ‘कोबी मंचुरियन’ खात असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे. याप्रकरणी बीएमआरसीएलने दोषी व्यक्तीवर कारवाई करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्या व्यक्तीला 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होण्याचे प्रकार समोर येत आहे. मेट्रोमध्ये अश्लील प्रकार करण्यांना आळा घालण्यासाठी DMRC कडून प्रयत्न करण्यात येत असले तरीही त्याचा लोकांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही आहे. आता दिल्ली मेट्रो नंतर बंंगळुरू मेट्रोमधून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रोच्या डब्यात ‘कोबी मंचुरियन’ खात असताना दिसत आहे. या व्यक्तीवर बीएमआरसीएलने कारवाई करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला 500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
हे सुद्धा वाचा
नेमकं प्रकरण काय?
बेंगळुरू मेट्रोमध्ये एक व्यक्ती नियमांना पायदळी तुडवत गोबी मंचुरियन खाताना दिसत आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे ही व्यक्ती दररोज मेट्रोने प्रवास करते. ही व्यक्ती मेट्रोमध्ये कोबी मंचुरियन खात असताना त्याच्या मित्रांनी विरोध केला मात्र, त्याने दुर्लक्ष केले.







