Begusarai Violence : सगळे मुस्लीम पाकिस्तानात गेले असते तर… केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

0
23
Begusarai Violence : सगळे मुस्लीम पाकिस्तानात गेले असते तर… केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य


माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, ज्यावेळी देशाची फाळणी झाली, त्यावेळी आपल्या पूर्वजांनी मोठी चूक केली आहे. फाळणीच्या वेळीच जर सगळे मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर आज भारताची अशी दुर्दशा झालीच नसती. आम्हाला जातींमध्ये विभागलं जात असून ते धर्म विचारून लोकांचे गळे चिरत असल्याचं सांगत गिरिराज सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. बिहार सरकारच्या लांगूलचालनाच्या धोरणामुळंच राज्यात धार्मिक यात्रांवर हल्ले आणि दगडफेकींच्या घटना घडत आहे. बेगूसरायमध्ये हिंदुंच्या शिवलिंगवर हल्ला झाला आणि त्या प्रकरणात चार हिंदुंना गोवण्यात आल्याचा आरोपही गिरिराज सिंह यांनी केला आहे.



Source link