तोंडले येथे रंगला बालआनंद मेळावा; परतवडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिवरायांवरील नृत्य सादरीकरण ठरले आकर्षण!

0
11
तोंडले येथे रंगला बालआनंद मेळावा; परतवडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिवरायांवरील नृत्य सादरीकरण ठरले आकर्षण!

तोंडले येथे रंगला बालआनंद मेळावा; परतवडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिवरायांवरील नृत्य सादरीकरण ठरले आकर्षण!


दहिवडी (ता. माण) : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती माण आणि केंद्रसमूह तोंडले यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्रस्तरीय बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा तोंडले येथे हा मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यात केंद्रसमूहातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला, कौशल्ये आणि सर्जनशीलता सादर करण्याची उत्तम संधी मिळाली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालचमूंचा उत्साह द्विगुणित केला.
या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. सोनलताई गोरे व मा. सौ. अलका जगदाळे, पंचायत समिती माणचे सभापती मा. श्री. विक्रम शिंगाडे, उपसभापती मा. सौ. प्रियांका जगदाळे तसेच सदस्या मा. सौ. उषा भोसले, मा. श्री. बाळकृष्ण कदम आणि मा. श्री. अर्जुन काळे उपस्थित होते.
तसेच विशेष उपस्थितीत गटविकास अधिकारी मा. श्री. प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. चंद्रकांत खाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी मा. श्री. लक्ष्मण पिसे, भाग विस्तार अधिकारी (शिक्षण) मा. श्री. विजयकुमार गंबरे, मा. शमिमबानू तांबोळी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
🎭  शाळेच्या विद्यार्थ्यांचा देखणा सांस्कृतिक आविष्कार
या मेळाव्यात जिल्हा परिषद शाळा परतवडी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य विशेष आकर्षण ठरले. मुलींनी ‘शिवरायांच्या वाघिणी’ तर मुलांनी ‘मावळे’ बनून सादर केलेल्या नृत्याने उपस्थित प्रेक्षक, पालक आणि मान्यवरांची मने जिंकली.
या उत्कृष्ट सादरीकरणासाठी मुख्याध्यापिका सौ. स्वाती साळवे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. रुपाली पवार मॅडम आणि विषय शिक्षक श्री. सुर्यकांत सुस्तरफोड सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी या नृत्यांची प्रभावी मांडणी केली.
✨ एकूणच, हा बालआनंद मेळावा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा, आनंदाचा आणि कलागुणांना वाव देणारा अविस्मरणीय उत्सव ठरला.