
कथानकातही दिसली हळवी बाजू!
आता या चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर, अतिशय साधं सोपं, पण तितकंच प्रभावी असं हे कथानक मनाला भावणारं आहे. या चित्रपटात एकूण सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा जरी बहिणींची असली तरी याची सुरुवात मात्र, आई आणि सासू यामध्ये कोण सरस या प्रश्नावरून सुरू होते. मुलगी लग्नानंतर जन्मदात्या आईऐवजी सासूवर अधिक प्रेम करते, हे पाहून त्या आईचा जळफळाट होतो. सासूपेक्षा आई कशी सरस हे दाखवण्यासाठी मंगळागौर स्पर्धेत भाग घेतला जातो. इथून सुरू होतो तो बहिणींच्या नात्याचा नवा प्रवास… सहा सख्ख्या बहीणी असल्यातरी त्यांच्या नात्यात काहीना काही कारणामुळे दुरावा आलेला आहे. मात्र, हाच दुरावा मिटवून त्या आपापल्या कोशातून कशा बाहेर पडतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.







