BAFTA Awards 2024: ‘बाफ्टा पुरस्कार २०२४’ची जय्यत तयारी सुरू; कधी आणि कुठे पार पडणार सोहळा? जाणून घ्या..

0
15
BAFTA Awards 2024: ‘बाफ्टा पुरस्कार २०२४’ची जय्यत तयारी सुरू; कधी आणि कुठे पार पडणार सोहळा? जाणून घ्या..


७७व्या बाफ्टा पुरस्कारांची यादी १८ जानेवारी २०२४ रोजी जाहीर झाली आहे. या यादीत ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने सर्वाधिक नामांकने मिळवली आहे. सध्या हा चित्रपट आघाडीवर आहे. ‘ओपनहायमर’ या चित्रपटाला सर्वाधिक १३ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. ‘बार्बी’ चित्रपटातील अभिनेत्री मार्गॉट रॉबी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले आहे. ‘बार्बी’ चित्रपटाला पाच नामांकने मिळाली आहेत. तर, ‘पुअर थिंग्ज’ला ११ नामांकन मिळाली आहेत. ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ आणि ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ यांना प्रत्येकी ९ नामांकन मिळाली आहेत. ‘मॅस्ट्रो’साठी ब्रॅडली कूपर, ‘रस्टिन’साठी कोलमन डोमिंगो, ‘द हँडओव्हर्स’साठी पॉल गियामट्टी, ‘सॉल्टबर्न’साठी बॅरी केओघन, ‘ओपेनहायमर’साठी सिलियन मर्फी आणि ‘पास्ट लाइव्ह्स’साठी तू यू यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले आहे. आता ‘७७व्या बाफ्टा’ पुरस्कारांमध्ये कोणाला किती पुरस्कार मिळतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link