Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी यांच्या सोबत झिशानलाही संपवायचं होतं! मारेकऱ्यांच्या कोर्टात मोठा गौप्यस्फोट

0
15
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी यांच्या सोबत झिशानलाही संपवायचं होतं! मारेकऱ्यांच्या कोर्टात मोठा गौप्यस्फोट


Baba Siddiqui Murder : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी एकाला पुण्यातून अटक केली आहे तर आणखी एकाचा शोध घेतला जात आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. . दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कोर्टात खळबळजनक खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या सोबत त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दीकी यांना देखील ठार मारण्याचे आदेश हल्लेखोरांनी दिले होते.



Source link