Baba Ramdev : कारवाईसाठी तयार राहा! दूसरा माफीनामा फेटाळत बाबा रामदेव यांच्यावर भडकले सुप्रीम कोर्ट

0
21
Baba Ramdev : कारवाईसाठी तयार राहा! दूसरा माफीनामा फेटाळत बाबा रामदेव यांच्यावर भडकले सुप्रीम कोर्ट


supreme court rejects baba ramdev apology : पतंजली आयुर्वेदने कोरोनावरील औषध कोरोनीलबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचा दूसरा माफीनामा देखील न्यायालयाने फेटाळला असून दोघांनाही पुन्हा कोर्टाने झापले आहे. आम्ही आंधळे नाहीत, आम्ही सर्व गोष्टी पाहतो आणि समजून देखील घेतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. बाबा रामदेव आणि पतंजली यांच्याकडून माफी मागणारे दुसरे प्रतिज्ञापत्र न्यायालयाने फेटाळले तसेच तुम्ही अवमानाच्या कारवाईसाठी तयार राहा, असे देखील कोर्टाने दोघांनाही सांगितले आहे.



Source link