
Ayodhya Ram Mandir Priest : अयोध्येतील राम मंदिराचे काम पुर्ण झाले असून २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी मंदिराच्या पुजारी पदाची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. राम मंदिर व्यवस्थापनाकडून पुजारी भरतीची घोषणा केल्यानंतर देशभरातील ३ हजार पुजाऱ्यांनी अयोध्येतील राम मंदिरात भरतीसाठी अर्ज केला आहे. मंदिर ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एकूण ३००० अर्ज प्राप्त झाले असून केवळ २०० जणांना पात्रतेच्या आधारावर मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.






