
‘वॉन्टेड’ या बॉलिवूड चित्रपटातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री आयेशा टाकिया गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगमुळे चर्चेत आहे. आयशा लोकांच्या द्वेषाने इतकी अस्वस्थ झाली होती की तिने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले. अलीकडेच आयशाने तिचे काही फोटो शेअर केले होते, ज्यानंतर ती सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आली होती. या फोटोमध्ये आयशाचा चेहरा खूप बदललेला दिसत होता. अनेक चाहत्यांनी तिला ओळखण्यास नकार दिला. मात्र अकाऊंट डिलीट केल्यानंतर दोन दिवसांनी आयशा पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक नवा व्हिडिओ घेऊन परतली आहे.








