गणेशोत्सवाचा मंगलमय उत्सव आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये

0
1
गणेशोत्सवाचा मंगलमय उत्सव आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये

फलटण – पारंपरिक उत्साह, भक्तीभाव आणि आनंदाचा संगम अनुभवायला मिळाला, जेव्हा आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या लक्ष्मीनगर व बिरदेवनगर शाखांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले.

सकाळपासूनच शाळेच्या परिसरात आनंदी व अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण हॉल सुंदर सजावट व रंगीत रांगोळ्यांनी खुलून गेला होता. विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा व लेझीमच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले.

मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांनी औक्षण केले, तर शाळेचे सेक्रेटरी निखिल सर यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. महाआरती, भजने आणि ढोल-ताशांचा गजर वातावरण अधिकच मंगलमय करणारा ठरला.

शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर, सेंटर हेड सुचिता जाधव मॅडम, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना गुळ-उकडीच्या मोदकांचा प्रसाद वाटण्यात आला.

या उत्सवातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील परंपरांचे महत्त्व, एकात्मतेची प्रेरणा व भक्तीचा अनुभव घेतला. शाळेच्या दोन्ही शाखांतील हा अविस्मरणीय सोहळा मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे अधिक प्रभावी ठरला.