
Rita Kaushik News : पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनीअर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी सुभाष यांनी सुसाईड नोट व व्हिडिओ करत अनेक आरोप केले होते. देशात पुरुषांसाठी कायदेच नसल्याचा आरोप सुभाष यांनी केला होता. या प्रकरणी नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यावर गुन्हा दाखल झाला असून पत्नी, सह तिच्या आणि भावाला अटक करण्यात आली आहे. आता सुसाइड नोटमध्ये नाव असलेल्या जज रिता कौशिक यांच्यावर बेंगरुळू पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहे.







