Ashwin Ramaswami | अश्विन रामास्वामी ठरला अमेरिकेत निवडणूक लढवणारा पहिला भारतीय अमेरिकन Gen Z उमेदवार! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Ashwin Ramaswami | अश्विन रामास्वामी ठरला अमेरिकेत निवडणूक लढवणारा पहिला भारतीय अमेरिकन Gen Z उमेदवार! | Navarashtra (नवराष्ट्र)


जेन-झी रामास्वामी जॉर्जियाच्या जिल्हा 48 मध्ये राज्य सिनेटसाठी निवडणूक लढवत आहेत.

भारतीय-अमेरिकन नागरिक अश्विन रामास्वामी (Ashwin Ramaswami) हा अवघा 24 वर्षाचा तरुण अचानक चर्चेत आला आहे. जेन-झी (Gen Z) असलेला हा तरुण अमेरिकन विधानसभेसाठी निवडणूक लढवणारा पहिला भारतीय अमेरिकन आहे. अमेरिकेतील जॉर्जिया सिनेटच्या जागेवरून तो निवडणूक लढवत आहेत. समाजाचा तरुण उदयोन्मुख नेता म्हणून रामास्वामी यांच्याकडे पाहिलं जात आहे.

डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार आहे रामास्वामी

जेन-झी रामास्वामी  जॉर्जियाच्या जिल्हा 48 मध्ये राज्य सिनेटसाठी निवडणूक लढवत आहेत.  जर तो निवडणूक जिंकला तर जॉर्जिया विधानमंडळातील तो पहिला भारतीय अमेरिकन बनणार. रामास्वामीने सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, निवडणूक सुरक्षा आणि तंत्रज्ञान कायदा आणि धोरण संशोधनात शिक्षण घेतलं आहे.






Source link