Ashutosh Gowariker: कतारला जाण्यासाठी जितेंद्र जोशीला आशुतोष गोवारीकरांनी केली होती मोठी मदत, नेमकं काय जाणून घ्या

0
20
Ashutosh Gowariker: कतारला जाण्यासाठी जितेंद्र जोशीला आशुतोष गोवारीकरांनी केली होती मोठी मदत, नेमकं काय जाणून घ्या


“मला एका कामासाठी कतारला जायचे होते आणि त्याचवेळी ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. हे चित्रीकरण कुर्ल्यात सुरु होते. त्याचदिवशी गोवारीकर यांना जुहूलामध्ये एका मीटिंगसाठी जायचे होते. त्यांचे काही सीन शूट व्हायचे होते. ‘सकाळी सात ते अकरा मी शूटिंग करतो. मग लगेच जुहूला जाऊन दुपारी तीनपर्यंत पोहोचतो’ असे ते म्हणाले होते. पण हे शक्य नाही. कारण बाकी सीन चित्रीत करून जितेंद्रला पाच वाजताची फ्लाइट पकडायची आहे, असे दिग्दर्शक मापुस्कर यांनी सांगितले. मी वेळेत पोहोचतो असे सांगून ते मीटिंगला गेले आणि दिलेल्या वेळेत परत आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप आणि कपडे तसेच होते. मला निघायचे असल्याने, पुन्हा मेकअपमध्ये वगैरे वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी तो तसाच ठेवला होता’, असे जितेंद्र म्हणाला.



Source link