
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा आज ४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपण अनेकदा पाहातो की अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून आवाज दिला जातो. पण त्यांना मामा का म्हटले जाते? हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…








