
शक्तीपीठ महामार्गासाठी कोण-कोणत्या जिल्ह्यातील जमीन जाणार –
वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गामुळं २१ तासांचा वेळ कमी होणार असून ११ तासांत प्रवास पूर्ण होणार आहे. एकूण ८०२ किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी ८६,००० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.







