
फलटण : नवचैतन्य हायस्कूल गोंदवले बु येथे मुख्याध्यापक पदी मागील वर्षी नियुक्ती झालेले शांत संयमी स्वभाव असलेले सुनिश्चित ध्येय शैक्षणिक कामाशी प्रामाणिक असेल विद्यार्थी प्रिय व विद्यार्थांना शिस्त लावणारे तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर आदरयुक्त धाक असलेले ,व आपल्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन ,शैक्षणिक व प्रशासकीय काम उत्तम प्रकारे करणारे फलटणचे मंगळवार पेठेतील शांत संयमी व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्यांची नियुक्ती फलटण तालुक्यातील शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे फलटण एज्युकेशन सोसायटीची मानबिंदू असणारे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे सुधीर चिंतामण अहिवळे यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे .
सुधीर चिंतामण अहिवळे यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या प्रवास हा दोन नंबर शाळेतून झाला आहे तर माध्यमिक शिक्षण हे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे पूर्ण करून , महाविद्यालयीन शिक्षण हे मुधोजी महविद्यालय फलटण येथे पूर्ण केले व शिक्षण शास्त्रात पदवी घेतल्यानंतर ज्या फलटण एज्युकेशन सोसायटी मध्ये सुधीर चिंतामण अहिवळे यांनी सर्व शिक्षण पूर्ण केले त्याच संस्थेमध्ये त्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याची खूप मोठी संधी त्यांना मिळाली .
नवचैतन्य हायस्कूल गोंदवले बु येथून सुधीर अहिवळे यांनी शिक्षक म्हणून ज्ञानदान करण्याची सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी आसू , पवारवाडी , म्हसवड , मालोजी राजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे उप मुख्याध्यापक म्हणून उत्तम प्रकारे काम केले आहे तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे मानबिंदू असलेले मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे उप मुख्याध्यापक व एक उत्तम प्रशासक म्हणून आपल्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाच्या ठसा उमटविला आहे .
विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शन तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीने सुधीर अहिवळे यांच्यावरती वेळोवळी दाखविलेल्या विश्वास , त्यांनी सार्थ ठरविला आहे तसेच त्यांनी आपली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती असणारे तळमळ व शैक्षणिक कार्याबद्दल असलेली श्रद्धा तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाची असलेली आवड व निष्ठा यामुळे सुधीर चिंतामण अहिवळे ( प्राचार्य ) यांची नियुक्ती मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .






