
ईडीने ३ जानेवारीला अरविंद केजरीवालांना समन्स बजावले होते. त्यावेळी आम आदमी पार्टीनं म्हटलं होतं की, अरविंद केजरीवाल ईडीला चौकशीत सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. मात्र, ईडीनं बजावलेलं समन्स हे राजकारणाशी संबंधित आहे. ते बेकायदेशीर असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. केजरीवाल यांना अटक करण्याचा ईडीचा डाव आहे, असाही आरोप करण्यात आला होता. ‘आप’ने म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी नोटीस का पाठवली? नोटीस म्हणजे केजरीवाल यांना प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न आहे. ‘आप’ने समन्सच्या वेळेवरही प्रश्न उपस्थित केले होते.







