Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल तुरुंगात असून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का देत नाहीत? दिल्लीमध्ये अजून राष्ट्रपती राजवट लागू नाही | Navarashtra (नवराष्ट्र)

0
27
Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल तुरुंगात असून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का देत नाहीत? दिल्लीमध्ये अजून राष्ट्रपती राजवट लागू नाही | Navarashtra (नवराष्ट्र)


अरविंद केजरीवाल तुरुंगात असून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का देत नाहीत? दिल्लीमध्ये अजून राष्ट्रपती राजवट लागू नाही

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कथित मद्य घोट्याळ्याप्रकारणी ईडीकडून अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर दिल्लीच्या राजकरणात अनेक चर्चा रंगल्या.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कथित मद्य घोट्याळ्याप्रकारणी ईडीकडून अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर दिल्लीच्या राजकरणात अनेक चर्चा रंगल्या. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीमाना द्यावा, यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र केजरीवाल यांनी तुरूंगातून पहिला आदेश जरी केला आहे. केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्याला महिना होऊन गेला तरीसुद्धा मोदी शाहांकडून कोणताही निर्णय देण्यात आला नाही. देशात राष्ट्रपती राजवट लागू करावी,अशी मागणी देखील अनेक विरोधकांनी केली होती. दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार, असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र त्यावर काहीच निर्णय झाला नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कारागृहात असल्याने, नेमकं दिल्लीच्या राजकारणात काय चालू आहे, असा प्रश्न सगळ्यांचं पडला आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्य सरकारी कामे केली जातात. पण मुख्यमंत्र्यांशिवाय सरकार काम करू शकतं का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता कारागृहात जाणारे देशातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे आता दिल्लीच्या या अवस्थेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.






Source link