Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

0
13
Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला


Archana express accident in Panjab : पंजाबमध्ये पुन्हा एकदा रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. या निष्काळजीपणामुळे आज मोठा अपघात झाला असता. लुधियानामधील खन्ना स्थानका दरम्यान, रुळावरून धावणाऱ्या अर्चना एक्स्प्रेसचे इंजिन बोगीपासून अचानक वेगळे झाले. ही बाब लोको पायलटच्या लक्षात आली नाही. यामुळे बोगींशिवाय हे इंजिन सुमारे तीन किलोमीटर धावत राहिले. ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अलार्म वाजवत याची  माहिती ड्रायव्हरला दिली. यानंतर चालकाने इंजिन थांबवत बोगी जेथे थांबल्या त्या ठिकाणी  इंजिन नेऊन बोगींना जोडले. सुदैवाने या वेळेत या ट्रॅकवरुन दुसरी रेल्वे आली नाही. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या ट्रेनमध्ये दोन ते अडीच हजार प्रवासी होते.



Source link