
एआर रहमानच्या रविवारी चेन्नईमध्ये झालेल्या शोमध्ये जो गदारोळ झाला, त्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली आहे. मुलांना धक्काबुक्की, महिलांची छेडछाड, चेंगराचेंगरी अशा अनेक घटनांमुळे ही कॉन्सर्ट चर्चेत आली आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये सामील झालेल्या लोकांनी तक्रार करताना म्हटले की, यावेळी आवाज इतका कमी होता की, काहीही ऐकू देखील येत नव्हते. अनेकांनी पॅनीक अटॅक, नर्व्हसनेस, खुर्च्यांचा अभाव अशा अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, नंतर एआर रहमान यांनी शोच्या या खराब व्यवस्थापनाची जबाबदारी घेत एक ट्विट करून चाहत्यांची माफी मागितली आहे.








