
मुलाखतीमध्ये रहमानने आंध्र प्रदेशमधील एका निर्मात्याने दिलेल्या ऑफरचा खुलासा केला. हैदराबादमधील बंजारा हिल्स येथे एक शानदार घर देतो असे निर्माता म्हणाला होता. ‘मला आजही लक्षात आहे १९९४मध्ये आंध्रप्रदेशमधील एका बड्या निर्मात्याने मला जर चैन्नईमधून बाहेर पडलास तर हैदराबाद येथे एक अलिशान घर देणार असल्याचे सांगितले. ते ऐकून माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. त्यानंतर मला सुभाष घईने हिंदी शिकण्याचा सल्ला दिला. तेथील लोक तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि त्यामुळे मी ती भाषा शिकवी असा त्यांचा हट्ट होता. मात्र, त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्ड माफियांचा दबदबा होता. त्यामुळे मी याचा विचारही केला नाही’ असे रहमान म्हणाला.








