AP Election Results | अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पहिलं यश; अरुणाचलमध्ये ‘इतक्या’ जागांवर विजय | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
AP Election Results | अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पहिलं यश; अरुणाचलमध्ये ‘इतक्या’ जागांवर विजय | Navarashtra (नवराष्ट्र)


अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पहिलं यश; अरुणाचलमध्ये ‘इतक्या’ जागांवर विजय

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. येथील १४ पैकी तीन जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा पहिला मोठा विजय मिळवला आहे.

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. येथील १४ पैकी तीन जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा पहिला मोठा विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश येथील याचुली, लेकांग आणि बोरदुम्सा-दियुन मतदारसंघातून टोको ताताउंग, लिखा सोनी आणि निख कामिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाला मिळालेले हे पहिलेच निवडणूक यश आहे. दरम्यान, आता अजित पवार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहेत.

निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या अजित पवार यांच्या गटाला खरा राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अरुणाचल प्रदेशात दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्यात यश आले आहे. २००९ मध्ये ३६ पैकी ५ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. २०१४ मध्ये त्यांनी ९ जागा लढवल्या होत्या, पण त्यांना खातेही उघडता आले नव्हते. २०१९ मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने निवडणूक लढवली नव्हती.






Source link