
Animal Box Office Collection Day 13: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. आता या चित्रपटाच्या १३व्या दिवसाचे कलेक्शन देखील समोर आले आहे. १३व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन थोडेसे गडगडले असले, तरी या चित्रपटाची छप्परफाड कमाई सुरूच आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘अॅनिमल’ चित्रपटाने रिलीजच्या १३व्या दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये १० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.








