Amravati Crime News: अंगणात उभ्या असणाऱ्या कुटुंबातील ६ जणांना कारने उडवले, तिघांचा मृत्यू; पूर्ववैमनस्यातून केले कृत्य

0
16
Amravati Crime News: अंगणात उभ्या असणाऱ्या कुटुंबातील ६ जणांना कारने उडवले, तिघांचा मृत्यू; पूर्ववैमनस्यातून केले कृत्य


Amravati Crime News : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातिल नाचोना गावात एक धक्कादायक घटन उघडकीस आली आहे. अंगणात उभ्या असणाऱ्या सहा जणांवर कार घालून त्यांना चिरडण्यात आले. यातील तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. गावातील एका व्यक्तीने जुन्या रागातून हे कृत्य केले. तसेच आरोपी हा गावातील दारू विक्रेता असल्याची देखील प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींना दवाखान्यात भरती केले असून त्यांची प्रकृती ही गंभीर आहे.



Source link