
Amitabh Bachchan Dance With Aishwarya: बॉलिवूडचं ‘बच्चन’ कुटुंब सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. कधी ऐश्वर्या रायने घर सोडलं, तर कधी ऐश्वर्या अभिषेक यांचा घटस्फोट झाला, तर कधी बच्चन कुटुंबात आपापसांत वाद, अशा अनेक अफवांनी बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये फेर धरलेला असतानाच आता अमिताभ बच्चन यांचा कुटुंबासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन एकत्र डान्स करताना दिसले आहे. नात आराध्या बच्चन हिच्या शाळेच्या वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन डान्सफ्लोरवर थिरकताना दिसले आहेत.








