
अमीषा पटेलने तिच्या ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की, ‘लॉजिंग व्यवस्थेपासून शूटिंगच्या शेवटच्या दिवशी चंदीगड विमानतळावर जाण्यापर्यंत आणि जेवणाचे बिलही यांनी भरले नाही. काही कलाकार आणि क्रू मेंबर्सना गाडीही देण्यात आली नव्हती. पण अनिल शर्मा प्रॉडक्शनमुळे निर्माण झालेल्या या सर्व समस्या झी स्टुडिओने हस्तक्षेप करून सोडवल्या.’ मात्र, अनिल शर्मा यांनी अमीषाचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सेटवर असं काहीच घडलं नाही असा निर्वाळा त्यांनी दिला.







