
गणेशने बहिणींची हत्या करण्यासाठी सुपात उंदीर मारण्याचे विष टाकून ते दोघींना प्यायला दिले. त्यात दोघींचाही मृत्यू झाला. गणेशच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी बहिणी संमती पत्र देत नव्हत्या. याचा राग गणेशच्या मनात होता. या दोघींचा जीव घेतल्यानंतर अनुकंपा नोकरीबरोबरच वडिलोपार्जित सर्व संपत्ती एकट्यालाच मिळेल, असा विचार करून त्याने दोन बिहिणींना संपवण्याचा त्याने थंड डोक्याने कट रचला.






