Alamgir Alam Arrested | झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आलमगीर आलम यांना ‘ईडी’कडून अटक; मनी लाँड्रिंगप्रकरणी कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)

0
99
Alamgir Alam Arrested | झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आलमगीर आलम यांना ‘ईडी’कडून अटक; मनी लाँड्रिंगप्रकरणी कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)


झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आलमगीर आलम यांना ‘ईडी’कडून अटक; मनी लाँड्रिंगप्रकरणी कारवाई

ईडीने झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आलमगीर आलम (Alamgir Alam) यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी आलमगीर आलम यांचे सचिव संजीव कुमार लाल यांचा नोकर जहांगीर आलम याच्या फ्लॅटमधून 32 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

रांची : ईडीने झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आलमगीर आलम (Alamgir Alam) यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी आलमगीर आलम यांचे सचिव संजीव कुमार लाल यांचा नोकर जहांगीर आलम याच्या फ्लॅटमधून 32 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरु आहे.

आलमगीर आलम यांची ईडीने त्यांची चौकशी केली. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी या प्रकरणी चौकशीसाठी रांची येथील ईडी कार्यालयात मंत्री पोहोचले होते. काही तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही अटकेची कारवाई केली आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. एजन्सीच्या किमान सात पथकांनी हा छापा टाकला होता. यामध्ये मोठी रक्कम जप्त करण्यात आली.






Source link