
इस्रायल सरकारने मतदानाद्वारे हा निर्णय घेतला. अल-जझीरा वृत्तवाहिनी कतारी प्रसारक द्वारे चालविली जाते.
गाझावरील सततच्या हल्ल्यांदरम्यान इस्रायलकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी रविवारी जाहीर केले की त्यांच्या सरकारने अल-जझीरा (Al Jazeera) वृत्तवाहिनीचं कार्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायल सरकारने मतदानाद्वारे हा निर्णय घेतला. अल-जझीरा वृत्तवाहिनी कतारी प्रसारकाद्वारे चालविली जाते. नेतन्याहू यांनी चॅनेलची कार्यालये कायमस्वरूपी बंद केली जात आहेत की ती मर्यादित कालावधीसाठी असतील याची माहिती दिली नाही.
हे सुद्धा वाचा
काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्विटरवर कळवले की त्यांच्या सरकारने कतारच्या मालकीचे ब्रॉडकास्टर अल जझीराचे देशातील कार्यालये बंद करण्यासाठी एकमताने मतदान केले आहे.








