
Akshay Kumar Corona: बॉलिवूडचा ‘खिलाडी कुमार’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होणार नाहीये. आगामी ‘सरफिरा’च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अक्षय कुमार याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याने स्वत:ला आयसोलेट केले आहे. केवळ अक्षय कुमारच नाही, तर ‘सरफिरा’ चित्रपटाच्या टीममधील आणखी ही काही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.








